नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सकाळी तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या दीड वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी देखील आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी स्पष्ट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर विरोधकांकडून टीका होत आहे. त्याच सोबत शेतकाऱ्यांसामोर मोदी सरकार झुकले अशा आशयाच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. हे तीन कृषी कायदे आम्ही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी देखील मागितली आहे. या पार्श्वभूमीवर मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी देखील मोदींना टोमणा मारला आहे.
राज्यपाल मलिक हे मागील काही दिवसांपासून मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर उघडपणे टीका करत आहेत. कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवरही त्यांनी सरकारला सुनावले होते. त्यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेचे स्वागत केले आहे. उशिरा का होईना मोदींना शहाणपणा सुचला, असा टोमणा त्यांनी मारला आहे. त्याच सोबत हे शहाणपण आधीच सुचायला हवे होते, मात्र अखेर मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला, असा टोमणा देखील त्यांनी मारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘जीता किसान हारा अभिमान, आंदोलनजीवी म्हणत शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या मोदींनी माफी मागावी’
- मोदींच्या निर्णयावर विश्वास कसा ठेवायचा?- प्रियंका गांधी
- …परंतु ही केवळ यूपी, पंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना?- विजय वडेट्टीवार
- कृषी कायद्यासंदर्भात चंद्रकांत पाटलांची पंतप्रधानांना ‘ही’ विनंती
- ‘जीता किसान हारा अभिमान, आंदोलनजीवी म्हणत शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या मोदींनी माफी मागावी’