रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हा केंद्र सरकारचा नोकर नाही – रघुराम राजन

 

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हा केंद्र सरकारचा नोकर नाही. त्याला आपला नोकरे समजणेही सरकारची मोठी चूक असल्याचे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. राजन यांनी आपल्या आय डू वॉट आय डू या पुस्तकात हे मत व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर बाबतच्या आपल्या दृष्टीकोनात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असा सल्लाही त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून दिला आहे.

गव्हर्नरच्या अधिकारांबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळ उडतो. याचा फायदा घेत सत्ताधा-यांकडून गव्हर्नरचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. सध्याच्या सत्ताधा-यांप्रमाणेच यापूर्वीच्या सरकारनेही गव्हर्नरचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील रिझर्व्ह बँकेची भूमिका कमकुवत झाली, असे त्यांनी म्हटले आहे.