जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करा ! – राम माधव

टीम महाराष्ट्र देश : जम्मू कश्मीरमध्ये भाजपने पीडीपी सोबत युती तोडली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक झाली. त्यामध्ये आज हा निर्णय घेण्यात आला. मोदींच्या काळात प्रथमच भाजप सत्तेतून बाहेर पडले आहे. भाजप नेते राम माधव यांनी युती तोडल्याची घोषणा केली असून जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जम्मू-कश्मीरचे सगळे मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते यांना बोलावण्यात आलं होत. कश्मीरमधल्या परिस्थितीबाबत या बैठकीत विस्ताराने चर्चा होणं अपेक्षित आहे. मोदी सरकारने पुकारलेली एकतर्फी शस्त्रसंधी, जाँबाज जवान औरंगझेब याची दहशतवाद्यांनी केलेली हत्या, रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारींची दहशतवाद्यांनी केलेली हत्या यामुळे मोदी सरकारवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत होती.

जम्मू-काश्मीर विधानसभेतील संख्याबळ

पीडीपी – २८
भाजपा – २५
काँग्रेस – १२
नॅशनल कॉन्फरन्स – १५