fbpx

राज्यपालांनी लोकशाहीची हत्या केली – सिद्धरामय्या

बंगळुरू – कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.सुप्रीम कोर्टात रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर काल सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान येडियुरप्पा आणि भाजप यांच्यावर विरोधकांकडू टीकेची झोड उठवण्यात येतीये. आरोप – प्रत्यारोपाच राजकारण रंगत असतानाच आता मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडे सात दिवसांची मुदत मागितली होती. त्यासाठी त्यांनी राज्यपालांना जे पत्र पाठवले होते. त्यामध्ये त्यांच्यासह १०४ आमदारांची नावे होती. त्या व्यतिरिक्त अन्य एकाही आमदाराचे नाव नव्हते तरी राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले हा निर्णय पूर्णपणे असंवैधानिक होता. असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे.

संविधानाचे पालन करण्याऐवजी राज्यपाल शहा आणि मोदींचे ऐकत आहेत. राज्यपालांनी लोकशाहीची हत्या केली. येडियुरप्पांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सात दिवस मागितले होते पण राज्यपालांनी १५ दिवस दिले यातून त्यांचे भाजपाबरोबर असलेले संगनमत दिसून येते असं देखील सिद्धरामय्या यांनी म्हंटले आहे.