मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागताच शिवसेना (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधातच बंड पुकारला आहे. सेनेतील अंतर्गत फुट आज महाविकास आघाडीवर भारी पडताना दिसून येत आहे. सर्व आमदारांसोबत एकनाथ शिंदे गुवाहाटीला (Guwahati) रवाना झाले होते. मात्र ते आज मुंबईला दाखल होत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण (corona positive) झाल्याची माहिती समोर येत आहे. उपचारासाठी ते रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यातील राजकारणात घडत असलेल्या हालचालीमध्ये राज्यपाल कोश्यारी यांचीही मोठी भूमिका येते. महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. मात्र कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता एकनाथ शिंदे मुंबईला येणार का? हा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान सध्या शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आणखीन 10 आमदार सोबत येणार असल्याचा मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आज दुपारी राज्यपालांची भेट घेत भाजपसोबत सत्तास्थापनेचा एकनाथ शिंदे यांचा डाव असल्याचे बोलले जात होते. मात्र आता कोरोनाने यात विघ्न आणले काय? अशा चर्चा रंगत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Bhagat Singh Koshyari corona positive – राज्यपाल कोश्यारी कोरोना पॉझिटिव्ह
- Bacchu Kadu : 36 आमदार सोबत एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल – बच्चू कडू
- Sachin Sawant : सत्तापिपासू, कुटील आणि निर्दयी हे भाजपचे समानार्थी शब्द; ‘काँग्रेस’चा टोला
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे दुपारी राज्यपालांना भेटण्याची शक्यता; राजकीय चर्चांना उधान
- Eknath Shinde : 40 आमदार माझ्यासोबत, आणखीन 10 आमदार सोबत येणार – एकनाथ शिंदे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<