घरगुती गॅसबाबत सरकारचा दिलासादायक निर्णय; पहिला मान पुणेकरांना!

घरगुती गॅस

नवी दिल्ली:  कोरोनामुळे हाताला काम नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यात आता महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या किंमतीत देखील वाढ होत आहे. यामुळे सामान्य माणूसाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र आता एक दिलासा देणारी बातमी समोर आलो आहे. घरगुती गॅसबाबत सरकारने चांगला निर्णय घेतला आहे.

यापुढे गॅसधारक ग्राहकांना आवडीच्या कोणत्याही एजन्सीकडून गॅसची खरेदी करता येणार आहे. सध्या एकाच कंपनीकडे गॅस ट्रान्सफर करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात चंढीगड, गुडगाव, रांची, कोईम्बतूर आणि पुणे येथे ही सेवा सुरु करण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण देशात ही योजना लागू होणार आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सध्या प्रायोगित तत्त्वावर ही योजना सुरु करण्यात आली असून योग्यरितीने यशस्वी झाल्यास ग्राहकांना दुसऱ्या कंपनीच्या एजन्सीमध्ये गॅस ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळणार आहे. नवीन योजनेमध्ये गॅस एजन्सीचा कुठलाही रोल असणार नाही. ग्राहकांना ऑनलाईन एलपीजी सिलेंडर भरण्याच्यावेळी कोणत्या एजन्सीकडून गॅस घ्यायचा हे ठरविण्याचा अधिकार आहे. जेव्हा संपूर्ण देशात ही सर्व्हीस सुरू होईल, तेव्हा ग्राहकांना याचा लाभ मिळेल, असेही सांगण्यात आले आहे.

याआधीच एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांना याचा चांगलाच फटका बसला आहे. आधीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य नागरिकाच्या खिशाला कात्री बसलेली आहे. सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील या सोई महाग होत असल्याने अनेक ठिकाणी याविरोधात आंदोलन देखील होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP