सरकारचं भविष्य लवकरच कळेल – संजय राउत

पुणे : सरकार मध्ये राहून सुधा जनतेच्या मनातील खद खद शिवसेने बाहेर काढलीये , तर सरकारचा मध्यंतरानंतरचा सिनेमा सुरू झाला असून सरकारचं भविष्य लवकरच कळेल अस वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी केलय.

पवार साहेबांना तर निवडणुकीच होकायंत्र म्हणलं जात त्यामुळे सर्व गोष्टी त्यांना लवकर कळतात. पवार हे मोदींचे राजकीय गुरू तर राज्यात भाजप आणि विरोधीपक्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये आहेत. असा घणाघात सुधा संजय राउत यांनी केलाय.

पुण्यामध्ये संजय राऊत यांनी आज सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुण्यातील शिवसेनेत मोठे खांदेपालट होणार असल्याच देखील संजय राउत यांनी स्पष्ट केलय. तर विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यात शिवसेनेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असल्याच देखील संजय राउत यांनी सांगितल आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्याचे शहराध्यक्ष विनाकाय निम्हण आपल्या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याच बोलाल जात होत. आणि सेनेला नवा शहराध्यक्ष मिळणार अस दिसत होत यावर आता संजय राउत यांनी शिक्कामोर्तब केले आहे. अस असल तर पुण्यात मरगळ आलेल्या शिवसेनेला उभारी देण्यासाठी संजय राउत काय बदल करतात हे पाहण्यासारख आहे.