8 नोव्हेंबरला पंतप्रधान करणार ही मोठी ‘घोषणा’

टीम महाराष्ट्र देशा : 8 नोव्हेंबरला ऐतिहासिक नोटबंदीच्या निर्णयाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे 8 नोव्हेंबर हा दिवस काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी काळा दिवस म्हणून साजरा करण्याच्या तयारीत आहेत तर सरकारने ‘अँटी ब्लॅक मनी’ दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटबंदीचे एक वर्ष आणि पुढील रणनीती याबाबत उद्या अर्थात 8 नोव्हेंबरला मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. नोटबंदीनंतर पंतप्रधान मोदी आता बेनामी मालमत्ता असणाऱ्या लोकांना पुढचं लक्ष्य बनवणार आहेत. पंतप्रधान मोदी 10 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीस भ्रष्टाचार विरुद्ध पुढचं पाऊल काय असणार याबाबत योजना सादर केली जाणार आहे.