देशात पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार नाही: शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा :माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘देशात भाजपला उतरती कळा लागली आहे, त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा सरकार येणार नाही’ असं विधान त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे.

ज्या राज्यात काँग्रेसचे अस्तित्वच नव्हते, त्या राज्यात काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी देशात तीन राज्यांत सत्ता परिवर्तन झाले आहे. जशी तीन राज्यांत भाजपची हार झाली आहे. हीच परिस्थिती लोकसभा निवडणुकीत दिसून येईल आणि भाजपला यश मिळणार नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

भाजप सरकारने सैन्यदलाने केलेल्या पराक्रमाचे घेऊ नये, सर्जिकल स्ट्राइकचे राजकारण करणे योग्य नाही आमच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले पण आम्ही त्याचे राजकारण केले नाही असंही शरद पवार पुढे बोलताना म्हणाले.