‘नागरिकांवर जबाबदारी ढकलून सरकारला हात वर करता येणार नाहीत’

navneet rana vs uddhav thakrey

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

तर, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानानंतर ‘मी जबाबदार’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. आपण आपली जबाबदारी ओळखून वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे या मोहिमेत आपण स्वतः सर्वानी पाळायचं आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

लॉकडाऊनला प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे असं म्हणता येणाार नाही. ज्या प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत, नियम पाळत नाहीत, त्यामुळे लॉकडाऊन अपेक्षितच आहे. मात्र, लॉकडाऊन जाहीर करताना सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफी देणं सरकारचं कर्तव्य आहे. आधी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आणि आता फक्त ‘मी जबाबदार’ असं म्हणून सरकारला हात वर करता येणार नाहीत,’ असं भाष्य नवनीत राणा यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या