‘पायी वारी काढणारच, कायदा सुवस्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार’ : बंड्यातात्या कराडकर

bandatatya

पुणे : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला असून रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी होऊ नये व त्यातून रुग्णसंख्या वाढू नये या साठी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून प्रार्थनास्थळे देखील बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, आता रुग्णांचा आलेख हा काहीसा उतरता असून येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन टप्प्याटप्याने हटवण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीपासून आषाढी वारी सह कार्तिकी, माघी आणि वारकरी संप्रदायात विशेष महत्व असलेल्या सोहळ्यांवर देखील निर्बंध लावण्यात आले असून मर्यादित स्वरूपात कार्यक्रम केले जात आहेत. दरम्यान मागीलवर्षी प्रमाणे सर्व प्रमुख सोहळ्याच्या पादुका थेट बसमधून नेण्यासाठीचा प्रस्ताव शासनांकडून देण्यात आला होता. मात्र सर्व सोहळा प्रमुखांनी त्याला नकार देत पायी वारी करण्याची आग्रही भूमिका मांडली होती.

त्यानुसार सर्व मागण्यांचा विचार करून शासनाने गठीत केलेली समितीने आपला अहवाल मंत्रिमंडळाकडे पाठवला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्या अहवालावर निर्णय येण्याआधीच वारकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आषाढीवारी पायीच नेणार अस म्हटलं आहे. वारकऱ्यांचे नेते हभप बंडात्यात्या कराडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

शासनाने पायी वारी नेण्यासाठी निर्बंध घालून परवानगी द्यावी अन्यथा वारीला येणारा समाज अनियंत्रित असेल आणि त्यावेळी काही कायदा सुवस्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असंही कराडकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या