मंत्र्यांच्या गाड्यांवर सरकारची उधळपट्टी; निलेश राणेंनी डागली तोफ

Nilesh Rane

मुंबई – राज्य सरकारची आर्थीक परिस्थिती नाजूक आहे. पैसा अत्यावश्यक सेवेवर खर्च करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या साठी 25 लाख रुपये किंमतीचा गाडी खरेदीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. या मान्यतेनुसार शिक्षण विभागाला वर्षा गायकवाड यांच्यासाठी वाहन खरेदी करता येणार आहे.

एकीकडे कर्मचार्यांना वेतन देणे सरकारला मुश्किल झाले तसेच शाळेतील शिक्षकांनाही काही महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना मंत्र्यांच्या गाड्यांवर सरकारकडून कोट्यवधीची उधळपट्टी करण्यात येत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.राज्य सरकारच्या वाहन आढावा समितीने विशेष बाब म्हणून या वाहन खरेदीसाठी परवानगी दिली आहे.

यानुसार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, शिक्षण अपर सचिव आणि कार्यालयीन वापरासाठी एक अशा एकूण 6 गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या एका इनोव्हा गाडीची किंमत (जीएसटी आणि इतर मिळून) 22 लाख 83 हजार रुपये आहे.

कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याने कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. मात्र शिक्षणमंत्री, क्रीडा मंत्र्यांच्या गाड्या खरेदीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल 1 कोटी 37 लाख रुपये मंजूर केले आहेत. जनतेचे सेवक असल्याचा दावा करत सत्ता स्थापन करणार्या उद्धव ठाकरे यांच्याकडून मंत्र्यांवर केलेली उधळपट्टीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीत असलेल्या खडखडाटामुळे अनेक विभागांतील कर्मचा-यांना निम्मा पगार देण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली असतानाही राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी इनोव्हा क्रिस्टा ही २२ लाख ८३ हजार किंमतीची आरामदायी कार खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी कर्ज घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर येत असताना हि उधळपट्टी या काळात कशाला असा जाब विचारत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपनेते निलेश राणे यांनी ट्वीट करत या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे. ठाकरे सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत पण पंचवीस तीस लाखाची गाडी मंत्र्यांसाठी विकत घ्यायला पैसे आहेत असं राणे यांनी म्हटलं आहे.

पबजीचं याडं लागलं, आई बापाला १६ लाखाला खड्ड्यात घातलं…

उद्धवसाहेब…! आम्ही तुमच्याकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय – संजय राऊत

पंतप्रधान तर लांबच आधी मुंबईत पुढचा महापौर बसवून दाखवा – नितेश राणे