सरकारचा गांधी विचारांना संपवण्याचा डाव; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा: सरकारचा गांधी विचारांना संपवण्याचा डाव आहे. असा आरोप धनंजय मुंडेनी सरकारवर केला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी राज्यात ग्रामसभा घेतली जात असे, मात्र शासनाने यामध्ये बदल केले. आता वर्षातील चार ग्रामसभा मे, ऑगस्ट, नोव्हेंबर व २६ जानेवारीला घेण्यात येणार आहेत. यामधून ऑक्टोबर महिना वगळण्यात आल्यामुळे धनंजय मुंडेनी सरकारवर आरोप केले.

धनंजय मुंडे म्हणाले, राष्ट्रीय दिनी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय अनाकलनीय आणि निषेधार्ह आहे. ज्या गांधीजींनी गावे समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार या देशाला दिला त्या गांधीजींच्या जयंती दिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा का रद्द करण्यात आली. गांधी विचारांना संपवण्याचा हा डाव आहे, असे म्हणत त्यांनी सरकारचा जाहीर निषेध केला.