Share

Ajit Pawar | “विनयभंगाचे कलम लावणे अतिशय भ्याड, सरकारने गुन्हा मागे घ्यावा” ; अजित पवार यांनी मागणी

Ajit Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला आहे, अशा शब्दात राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महत्त्वाचे विषय आहेत त्याला बगल देण्याचे काम होते हे महाराष्ट्राला मारक आहे, असे अजित पवार म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले की, सरकारने लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहाता जर कोणी कायदा हाती घेतला, चूक केली, नियमाप्रमाणे वागले नाही तर जरूर कारवाई करावी. मात्र कारण नसताना नवीन कायदे नियमाचा आधार घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे, जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम कोणी करत असेल याकडे जनतेने जागरुकतेने पाहावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची आग्रही मागणी अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली.

अजित पवार भडकले- 

“अतिशय गलिच्छ असे प्रकार घडत आहेत. राजकीय वैचारीक मतभेद असू शकतात. मतमतांतर असू शकते, मात्र अशाप्रकारे घटना घडल्या तर महाराष्ट्राला त्या परवडणाऱ्या नाहीत. यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ शकते. राज्यातील प्रमुख प्रश्न बेरोजगारी, महागाई, प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. यात आरोप- प्रत्यारोप आताच्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुरु आहेत. आव्हाडांवर असे कलम लावण्याचे कारण नव्हते पण एका लोकप्रतिनिधीला अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. हा अतिशय भ्याड प्रकार आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. जसे चार दिवस सासुचे तसे चार दिवस सुनेचे देखील असतात”, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांची भेट घेणार- 

“महत्वाच्या विषयाला बगल देण्याचे काम सुरु आहे. मी मुंबईला जाणार असून जितेंद्र आव्हाड यांची भेट घेणार आहे. नवीन कायदे-नियमांचा आधार घेऊन कोणी लोकप्रतिनीला बदनाम करण्याचे काम करत असेल तर जनतेने देखील जागृत होत ह्या गोष्टी पाहील्या पाहीजेत. सरकारने देखील चुंकल म्हणून सांगायचं धाडस दाखवायला पाहिजे. आव्हाडांवर जो चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा मागे घेतला गेला पाहीजे”, अशी माझी सरकारला आग्रही मागणी असल्याचे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now