तेराशे शाळा बंद करण्याच्या जीआरची छात्रभारतीकडून होळी

chatr bharati

पुणे: पटसंख्या आणि घसरता दर्जाचे कारण करत राज्य सरकारने नुकतेच राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असुन यामुळे दुर्गम भागातील मुलांचे नुकसान होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने जीआरची होळीकरून निषेध नोंदवण्यात आला आहे.

राज्यात अऩेक शाळा पटसंख्या अभावी बंद आहेत. शिवाय शिक्षकाचीही कमतरता असुन शासनाने या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण राज्य सरकारने या शाळा बंद करणार ऩसुन त्या स्थलांतरीत करणार असल्याचे मंत्री विनोद तावडेनी सांगितले पण या शाळां बंदच करण्याचा डाव या सरकारचा असुन तो डाव हाणुन पाडण्यात येईल तसेच शाळा बंद झाल्याने दुर्गम भागातील मुलांचे नुकसान होणार आहे तर कोकणातील मुलांना शाळेसाठी तालुका स्तरावर जावे लागणार आहे त्यामुळे हा निर्णय शासनाने मागे घ्यावा. अशी मागणी छात्रभारतीच्यावतीने करण्यात आली. यावेळी विदयार्थ्यीनी शासनाचे परिपत्रक जाळण्यात आले. तर शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.