शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमवर सरकारने कारवाई करावी – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक व्यक्तव करणाऱ्या नगरच्या भाजपच्या उपमहापौराचा जाहीर निषेध व्यक्त करत , अशा विकृत प्रवृत्तीवर सरकारने तातडीने कारवाई करण्याची  मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे .

Loading...

 

दरम्यान श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर संपूर्ण नगर शहरात याचे पडसाद उमटत आहेत. तसेच भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी श्रीपाद छिंदम याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. श्रीपाद छिंदम याची भारतीय जनता पार्टि व उपमहापौर पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

श्रीपाद छिंदम यांचे कार्यालय फोडले

उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे संतप्त जमावाने श्रीपाद छिंदम यांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली.

shripad chindam

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदम हे अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर आहेत. छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावरून मनसेतील मतभिन्नता चव्हाट्यावर