सरकारने ‘मी लाभार्थी’ जाहिरातीत बाबा रामदेवांचा फोटो टाकावा: अशोक चव्हाण

बई : आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत पतंजलीची उत्पादने विकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला सर राजकीय स्तरातून विरोध होत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपला टोला मारत बाबा रामदेवच या सरकारचे खरे लाभार्थी आहेत. त्यामुळे सरकारने मी लाभार्थी’ जाहिरातीत बाबा रामदेवांचा फोटो टाकावा, असे म्हटले.

Loading...

काय म्हणाले अशोक चव्हाण ?

परवानगी देणारे राज्य सरकार पतंजलीचे एजंट झाले आहेत. राज्य सरकार जनतेच्या हिताची कामे सोडून आता पतंजलीसारख्या कंपनीचे वितरक बनले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पतंजलीची उत्पादने विकण्याचा घाट सरकारने घातला आहे.

यापूर्वीही राज्य सरकारने कवडीमोल दराने पतंजलीला ६०० एकर जमीन दिली आहे. बाबा रामदेव यांनी कॉंग्रेस सत्तेत असताना विदेशातील काळ्या पैशाबद्दल अनेक बेछूट आरोप केले होते. सत्तेत येण्यासाठी बाबा रामदेवांनी भाजपची मदत केली होती, त्याची परतफेड म्हणून सरकार पतंजलीवर मेहेरबान झाले आहे.

कोट्यवधी रुपयांचा नफा कमावणाऱ्या पतंजलीच्या उत्पादनांची विक्री राज्य सरकारच्या सेवा केंद्रामार्फत करणे देशातील इतर नवउद्योजकांवर अन्यायकारक आहे. सरकार फक्त काही निवडक लोकांसाठीच कार्यरत असून, बाबा रामदेव त्यापैकी एक आहेत, हे स्पष्ट झाले आहे. त्यापेक्षा सरकारने राज्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीची सोय करून द्यावीLoading…


Loading…

Loading...