न्यायालयीन कामकाजात सरकारनं हस्तक्षेप करु नये ; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

uddhav thakre

मुंबई: फक्त निवडणुका जिंकणं म्हणजे कारभार नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. तसेच न्यायालयीन कामकाजात सरकारनं हस्तक्षेप करु नये, न्यायव्यवस्थेला त्यांचं काम करु द्यावं. न्यायमुर्तींनी पत्रकार परिषद घेणं धक्कादायक होत. असे मत मत ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन आपले गऱ्हाणे मांडले. मुळात त्यांच्या तक्रारींकडे गाभीर्याने लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या तक्रारींच्या खोलात जायला हवे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप न करता तसेच या विषयाचे राजकरण न करता. या तक्रारींचा निवाडा व्हायला हवा.’ तसेच न्यायालीन कामकाजात सरकारनं हस्तक्षेप करू नये, न्यायव्यवस्थेला त्यांचं काम करु द्यावं. न्यायमुर्तींनी पत्रकार परिषद घेणं धक्कादायक होत. तसेच न्यायव्यवस्था ही आंधळी असल्याचं म्हटलं जातं. ती निःपक्षपातीपणाने निर्णय देते म्हणून, तिला आंधळी म्हटले जाते. पण, याच न्याय व्यवस्थेला आंधळी आणि बहिरी करण्याचे काम कोणी करत आहे का?, याचा शोध घेतला पाहिजे. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा का? असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे.