शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; सरकारने एकरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे : धनंजय मुंडे

0Dhananjay_Munde_0

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप मराठवाड्यात पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट ओढवले आहे. याविषयी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून ‘केंद्र सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजनेची घोषणा केली. मात्र या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. या अनुदानाचा पहिला टप्पा म्हणून २ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. शेतकऱ्यांना एक फुटकी कवडी देखील मिळाली नाही.

तसेच अजूनही बऱ्याच ठिकाणी सुरळीत पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटसुद्धा ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने यात लक्ष घालावे. अशी मागणी केली आहे.