शिवरायांचा आदर्श घेवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे : अमोल कोल्हे

टीम महाराष्ट्र देशा : प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांचा आदर्श घेण्याची गरज असल्याचं विधान केले आहे. शिवरायांनी शेतकऱ्यांसंबंधी जशी धोरणं आखली होती त्याचप्रमाणे सरकारने उपाययोजना कराव्यात अशी लोकसभेत केली आहे.

Loading...

अमोल कोल्हे यांनी लोकसभेत बोलताना ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असं शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. शेतकऱ्यांसंदर्भात सरकारकडून आम्हाला तशीच अपेक्षा आहे. शेतीसंदर्भातील प्रश्नांवर काहीतरी ठोस उपाययोजना केल्या जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे अस विधान केले.

पुढे बोलताना कोल्हे यांनी ‘दरवेळी प्रश्न उत्तराच्या तासात शेतीसंदर्भात प्रश्न विचारले जातात तेव्हा दरवेळी शेतकऱ्यांना सहा हजार दिले जातील असेच उत्तर दिले जाते. मात्र आज शेतकऱ्याला दिवसाला १७ रुपये रोजगार मिळतो. हे १७ रुपये म्हणजे त्यांचा सन्मान आणि की चेष्ठा हेच कळत नाही. तसेच सहा हजार वर्षाला दिले तरी ५०० रुपये महिना हा हिशेबाने घर चालवता येते का? ५०० रुपये महिना दिल्यास शेतीची देखभाल करणे शक्य आहे का? असे प्रश्नही कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केले.Loading…


Loading…

Loading...