नागरिकांनी घर, औषधी खर्च करावा की, हेल्मेट वर खर्च करावा हे आता सरकारने ठरवावं, मनसेचा हेल्मेटसक्तीला विरोध

औरंगाबाद : वाहतूक पोलिसांकडून आता दुचाकीस्वारासह दुचाकीच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती करण्याचे फर्मान काढले आहे. बुधवार पासून त्याची अंबलबजावणी होणार आहे. याला मनसेकडून विरोध दर्शविण्यात आला असून नागरिकांनी घर, औषधावर खर्च करावा की, हेल्मेटवर खर्च करावा हे आता सरकारने ठरवावं असा सवाल देखील राज्यउपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केला आहे.

कोरोना संसर्गामुळे नागरिक आधीच हैराण आहे. त्यात आता पोलीस प्रशासाकासून हेल्मेटसक्ती करून भर टाकण्यात येत आहे. कडक निर्बंधामुळे बहुतांश नागरिक सध्या घरात बसून आहे. अत्यवश्यक कामासाठीच नागरिक घरा बाहेर निघत आहे. त्यात आता या सक्तीमुळे नागरिक नाहक परेशान होणार आहे. सध्या बहुतांश नागरिकांकडे हेल्मेट नाही. हेल्मेटची दुकाने देखील उघडी नाही. मग नागरिकांनी हेल्मेट आणायचे कुठून? असा सवाल सुमित खांबेकर यांनी उपस्थित केला.

अत्यावश्यक सेवेत काम करणारे अनेक दुचाकी वापरणारे यांना हेल्मेटच्या कारवाईला सतत सामोरे जावे लागणार आहे. दुकानदार त्यांच्याकडे काम करणारे, नौकरदार यांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास आहे. त्यामुळे या निर्णयाला मनसेकडून विरोध असल्याचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या