संलग्न दीर्घ मुदती कर्जावरील व्याज सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र पुरस्कृत TUF योजनेशी संलग्न दीर्घ मुदती कर्जावरील व्याज सवलत योजना असे या योजनेचे नाव आहे. शासन निर्णय क्र. धोरण 2012/प्र.क्र. 1 /टेक्स-2, दि. 1 मार्च,2012 या योजनेचा शासन निर्णय आहे.

राज्यातील कापड उद्योगात वाढ, रोजगारामध्ये वाढ आणि कापूस उत्पादक क्षेत्रात प्राथम्याने दिर्घ मुदतीच्या आश्वासक विकासासाठी कापूस ते तयार वस्त्र निर्मितीच्या विविध स्तरावरील प्रक्रिया घटकाच्या उभारणीकरीता बॅंकेमार्फत घेण्यात आलेल्या दिर्घ मुदती कर्जावरील व्याजाची प्रतीपुर्ती देणे असा या योजनेचा उद्देश आहे.

सदर योजनेसाठी 12.5% किंवा बँकेचे प्राईम लेंडीग रेट/बेस रेट किंवा प्रत्यक्ष आकारण्यात आलेला व्याजदर यापैकी जे दर कमी असेल तेवढा उच्चतम व्याजदर गृहित धरण्यात येईल, सदर योजनेअंतर्गत लाभ नवीन वस्त्रोद्योग घटकासाठी तसेच अस्तित्वातील वस्त्रोद्योग घटकांच्या आधुनिकीकरणासाठी/विस्तारीकरणासाठी/पुनर्वसनासाठी अनुज्ञेय, सर्व स्त्रोतातून (केंद्र पुरस्कृत TUFS, उद्योग विभाग इत्यादि) मिळणारी व्याज सवलत धरून फक्त 0% व 2% एवढे व्याजदर पडेल तोपर्यंतच्या व्याजदराची प्रतिपूर्ती व्याज सवलत योजनेसाठी पात्र प्रकल्प दि.1 एप्रिल,2011 ते दि. 31 मार्च, 2017 या कालावधीत केंद्र पुरस्कृत TUFS योजनेअंतर्गत मंजूर होणारे झालेले/होणारे प्रकल्प अशा योजनेच्या प्रमुख अटी आहे.

सदर योजना हि बॅंक/वित्तिय संस्था यांचेमार्फत केंद्र पुरस्कृत टफ योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येते. योजने बाबतच्या कागदपत्रांची पुर्तता बॅंकेमार्फत केली जाते. शासन निर्णय दिनांक 1 मार्च 2012 मध्ये नमुद केलेप्रमाणे कागदपत्रे बँकांमार्फत सादर करणे आवश्यक कागदपत्रे लागतात.

सर्व स्त्रोतातून (केंद्र पुरस्कृत TUFS, उद्योग विभाग इत्यादि) मिळणारी व्याज सवलत धरून फक्त 0% व 2% एवढे व्याजदर पडेल तोपर्यंतच्या व्याजदराची प्रतिपूर्ती असे दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप आहे. बॅंकेमार्फत ऑनलाईन या योजनेचा अर्ज भरता येईल. कार्यासन टेक्स-5, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, नवीन प्रशासन इमारत, 14 वा माळा,मंत्रालय,मुंबई-400032 Email- [email protected] असे संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता आहे. तसेच Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ www.mahatextile.maharashtra.gov.in असे आहे.