साईबाबांच्या जन्मस्थळानंतर आता संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी सरकारकडून भरघोस निधी

मुंबई : संत चोखामेळा, जन्मस्थळ असलेल्या मेव्हुणाराजा, ता. देऊळगाव, जि. बुलढाणा येथील समाज मंदिर बांधकामास साडेचार कोटी रुपये देणार असून 14 एप्रिल 2021 ला याचे उद्घाटन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

संत चोखामेळा जन्मस्थळ विकासकामाच्या आढावाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत असलेली घटनास्थळे व महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना पर्यटनाचा दर्जा देऊन या स्थळांचा विकास करणे याअंतर्गत संत चोखामेळा जन्मस्थान मेव्हुणाराजा ता. देऊळगाव राजा येथील जन्मस्थळ विकसित करण्यात येणार आहे.

Loading...

मुंडे म्हणाले, संत चोखामेळा जन्मस्थळ मेव्हुणाराजा येथील समाज मंदिरास साडेचार कोटी रुपये देणार असून त्याव्यतिरिक्त नव्याने फर्निचरसाठी सुधारीत प्रस्ताव तत्काळ सादर करावे. यापूर्वी शासनाने 51 लाख रुपयांचा निधी दिला होता त्याची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. जन्मस्थळ परिसराचे सुशोभिकरण पूर्णत्वास आले आहे. जन्मस्थ्ळाच्या विकासकामासाठी आवश्यक असल्यास वाढीव निधी देण्यात येणार आहे.

यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण