fbpx

आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार : नारायण राणे

narayan rane

मुंबई : राज्यामध्ये सुरू असणाऱ्या आंदोलनावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, या भेटीदरम्यान राज्यामध्ये सुरू असलेले आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी दिली आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठा आरक्षणाला पाठींबा द्या, अन्यथा आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे

प्रश्न सोडवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा लागेल, त्यामुळे राज्यामध्ये सुरू असणारे आंदोलन मागे घेण्याची विनंती नारायण राणे यांनी केली आहे. तसेच आंदोलन थांबल्यास सरकार तातडीने निर्णय घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील निरव मोदी; नितेश राणे यांची कणखर टीका

हिंसक मार्गाने होत असलेल्या आंदोलनामुळे राज्याचे नुकसान होत आहे, मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी मी मध्यस्थी करायला तयार असल्याचेही राणे यांनी सांगितले. तसेच सरकार आरक्षण देण्यास सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मी आधीच नेता आहे त्यामुळे आंदोलनात नेता होण्यासाठी आलेलो नसल्याचे स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिले.

VIDEO : अखेर नारायण राणेंनी घेतली खासदारकीची शपथ !