कर्नाटकमधील कुमारस्वामी याचं सरकार ५ जुलैला कोसळणार?

टीम महाराष्ट्र देशा – कर्नाटकमधील राजकीय अस्थिरता आता वाढू लागली आहे. येत्या पाच जुलैला मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच त्यांचं सरकार कोसळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कुमारस्वामी यांच्या सरकारला धक्का देण्याची तयारी काही कॉंग्रेसच्या आमदारांनी सुरु केली आहे.

अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते आक्रमक झालेत. त्यांची ही नाराजी कुमारस्वामी सरकारला महागात पडू शकते, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, आपल्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे हा गट भाजपाला जाऊन मिळू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

bagdure

काय आहे वादाचे नेमके कारण ?

शेतकरी कर्जमाफीचं जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन आपल्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मानस आहे. परंतु, काँग्रेसकडून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. कर्जमाफीच्या निर्णयाला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा देखील पाठिंबा नाही. काँग्रेसचे नाराज आमदार भाजपाला साथ देतील आणि कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल, असं गणित राजकीय वर्तुळात मांडलं जातंय.

You might also like
Comments
Loading...