‘नियमांचं तातडीनं पालन करा अन्यथा परिणामांना सामोरे जा’; सरकारचा ट्विटरला निर्वाणीचा इशारा

नरेंद्र मोदी

नवी दिल्ली- जवळपास तीन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने समाजमाध्यम क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, अशा कंपन्यांसाठी नवी नियमावली जारी केली. तसेच, या नियमावलीमधील तरतुदींचं पालन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देखील दिली. २६ मे पासून देशात नवी नियमावली लागू करण्यात आली. मात्र, सोशल मीडियावरील एक लोकप्रिय माध्यम असलेल्या ट्विटरनं अजूनही या नियमावलीनुसार अंमलबजावणी केली नसल्यामुळे आता केंद्र सरकारने ट्विटरला शेवटचा इशारा दिला आहे.

सरकारनं ट्विटरला सांगितलं की, नियमांचं तात्काळ पालन करण्यासाठी सरकार ट्विटरला अंतिम नोटीस देत आहे. नियमांचं पालन न केल्यास आयटी कायदा 2000 च्या 79 कलमांतर्गत सूट रद्द होईल आणि ट्विटर आयटी कायदा आणि इतर कायद्यांनुसार दंड देण्यास पात्र ठरतील. यापूर्वीही सरकारनं कंपनीला भारतीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा सल्ला दिला होता. मात्र अजूनही ट्विटर कंपनीनं माहितीसाठी भारतीय अधिकाऱ्याची नेमणूक केली नाही.

लवकरच भारतीय अधिकाऱ्याची नेमणूक करा, असं सरकारनं ट्विटरला बजावलं आहे. जर कंपनी भारतीय अधिकाऱ्याची नेमणूक करत नसेल तर परिणामासाठी तयार राहा, असा इशारा सरकारनं ट्विटरला दिला आहे.आपल्या पत्रात मंत्रालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, जर ट्विटरने डिजिटल नियमांचे पालन केले नाही. तर आयटी कायदा 2000 कलम 79 अन्वये त्यांचे ‘इंटरमीडियरी’ चा कायदेशीर दर्जा संपुष्टात आणला जाईल.

महत्वाच्या बातम्या 

IMP