‘सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी म्हणून निर्बंध’

uddhav

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारडून कडक निबंध देखील लागू केलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित दुकानेही बंद ठेवण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.

परंतु व्यापाऱ्यांनी या मिनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील व्यापारी संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी सारखी असून एप्रिल अखरेपर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२ लाखांवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे आपल्याला असे कडक निर्बंध लागू करावे लागले आहेत.

लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करूया, असे आवाहनही आज त्यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या