‘मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, तिघाडी सरकारने तात्काळ मदत करण्याची गरज’

Babanrao Lonikar

जालना : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या हातून पिक निघून गेले आहे. अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप पंचनाम्यासाठी देखील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे.

या संदर्भात आमदार लोणीकर म्हणाले की, ‘घनसावंगी जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव, पाणेवाडी, सिंदखेडा, कुंभार पिंपळगाव, राजा टाकळी, अंतरवाली, तर्थपुरी मोहपुरी, निपाणी पिंपळगाव, माणेपूरी आदी ठिकाणी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली..! जालना जिल्हासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून आता झालेल्या अतिवृष्टी ने अनेक शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत अश्या परिस्थितीत तिघाडी सरकारने तात्काळ मदत करण्याची गरज आहे..!!’

मराठवाड्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे उभे पिक हातातून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. मात्र, पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्षा करावी लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या