लोकसभा – विधानसभा एकत्र घेण्यासाठी सरकारच्या हालचाली, राज्य सरकार पाठवणार केंद्राला अहवाल

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची समिती देणार केंद्राला अहवाल

टीम महाराष्ट्र देशा: देशभरात कायम चालणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकांमुळे वाया जाणारे कामकाजाचे दिवस आणि खोळंबणाऱ्या विकासकामांवर उपाय म्हणून लोकसभा – विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरु आहेत. याबाबत आता राज्य सरकारकडून केंद्र सरकारला अहवाल दिला जाणार आहे, हा अहवाल तयार करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश असलेल्या दोन सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे.

bagdure

राज्य सरकारकडून नेमण्यात आलेली समिती राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या संस्था आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याच सांगितल जात आहे. पुढील ४ महिन्यांमध्ये हा अहवाल केंद्र सरकारला द्यावा लागणार आहे.

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारला सत्ता गमावण्याची भीती असल्यानेच एकत्र निवडणुकांचा घाट घातला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर आपण कोणत्याही विशीष्ट पक्षाला फायदा होण्यासाठी नाही, तर भविष्याचा विचारकरून अहवाल तयार करणार असल्याच मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

You might also like
Comments
Loading...