‘डोंबिविलीत घडलेल्या घटनेपेक्षा सरकारमधल्या नेत्यांना विनयभंगाची घटना जास्त मोठी वाटतीये’

chitra wagh

मुंबई : मुंबई येथील एका भाजप नगरसेविकेच्या कार्यलयात एक धक्कादायक घटना घडली असल्याचा प्रकार आता समोर आला आहे. बोरिवली येथील एका भाजपा महिला नगरसेविकेच्या कार्यालयातच एका कार्यकर्त्याने एका महिलेला मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात बुधवारी विनयभंग केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणावरुन काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी भाजपा नगरसेविकांनी मारहाण केली असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. यासंदर्भात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी म्हटलंय की, ‘या प्रकरणात आम्ही कुणालाही पाठीशी घालत नाहीये. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जरुर चौकशी करा. कसून चौकशी करा. यात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल तर त्याच्यावर कारवाई जरुर करा. मात्र, इतर घटना असतात त्यावेळी का बरं शांत बसतात आज डोंबिविलीत घडलेल्या घटनेपेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची विनयभंगाची घटना जास्त मोठी वाटतीये. त्याचीही चौकशी पोलिसांनी कसून करावी आणि आरोपीला शिक्षा करावी. डोंबिवली १४ वर्षीय मुलीवर ३० जणांचा सामुहीक बलात्कार घटनेसंदर्भात संध्याकाळी मानपाडा पोलिस स्टेशन डोंबिवली येथे पोहचणार आहे,’ असे देखील यावेळी चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या