fbpx

सरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार

पुणे : सरकार सत्तेवर आल्यापासून धार्मिक शांतता आणि सौहार्दतेला धक्का बसलेला आहे. वातावरण शांत करण्यापेक्षा हे सरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. याबात त्यांनी ट्विट करून सरकारवर टीका केली आहे.

यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारी या कालावधीत 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या मराठी साहित्य संमेलन संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर संमेलनाच्या आयोजकांनी सहगल यांना उपस्थित राहण्यास नकार कळवला आहे. त्यावरून सध्या महाराष्ट्रात चांगलेच वातावरण तापले आहे. यावरूनच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून सरकारवर टीका केली आहे.

“देशात आणि राज्यातही वातावरण चांगलं नाही, हेच नयनतारा सहगल यांच्या या घटनेवरुन सिद्ध होतं. हे सरकार सत्तेवर आल्यापासून धार्मिक शांतता आणि सौहार्दतेला धक्का बसलेला आहे. वातावरण शांत करण्यापेक्षा हे सरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करताना दिसत आहे.” असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.