ब्रेकिंग : धनगर समाजाच्या झुंजार लढ्याला यश,आदिवासींच्या सर्व सवलती लागू

टीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला असून धनगर समाजाने मोठा लढा उभा केला आहे. या लढ्याला आता यश मिळताना दिसत आहे. राज्य सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला असून आदिवासी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सुविधा मिळतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे धनगर आरक्षणाचा लढ्याला यश मिळालं आहे. अनुसूचित जमातींमध्ये धनगरांचा समावेश करावा, अशी धनगर समाजाची प्रमुख मागणी होती.त्यादृष्टीने उच्चस्तरीय उपसमितीने हा निर्णय घेतला.

Loading...

दरम्यान,धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी करमाळ्यात केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी आम्हाला करत आहात आणि मतं देताना मात्र दुसऱ्याला द्यायचे, हे वागणं बर हायका, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. आता सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे धनगर समाज भाजपसोबत जाणार का हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?