ऑनलाईनच्या नावाखाली सरकार आयटी विभागामार्फत मोठा गैरव्यवहार करत आहे : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : सरकार ऑनलाईनच्या नावाखाली माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत मोठा गैरव्यवहार करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. नियम २८९ अन्वये आज हा विषय उपस्थित करताना धनंजय मुंडे यांनी हा आरोप केला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुका आणि जिल्हास्तरावर इंटरनेटशिवाय वायफायने जोडणारा “महानेट” हा प्रकल्प राज्यशासनाकडून नुकताच सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी पाच सल्लागार समित्या नेमण्यात आल्या आहेत. मात्र यासाठी केंद्र सरकारच्या आयएलएफएस या कंपनीचे ऑडीट करताना ९१ हजार कोटीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सेबीने दोषी ठरवले व काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु केलेल्या “डेलॉईट” या कंपनीच्या सल्लागारांची प्रकल्पात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल आणि मुख्य सचिवांपेक्षाही जास्त मानधन घेऊन या कंपनीचे सल्लागार नेमका महाराष्ट्र सरकारला सल्ला तरी काय देतात ? असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला आहे.
दरम्यान “डेलॉईट” कंपनीस दरवर्षी सुमारे १५ कोटीचे कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकल्पात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणाऱ्या सहा कंपन्यापैकी पाच कंपन्या या परदेशी आहेत. या “डेलॉईट” कंपनीच्या प्रमुख सल्लागाराला ३ लाख ५६ हजार रुपये तर मुख्य सल्लागाराला ३ लाख ६ हजार रुपये प्रतिमहिना इतके मानधन दिले जात आहे.

 Loading…
Loading...