जनतेच्या आशा-आकांक्षाना सुरुंग लावणाऱ्या सरकारला खाली खेचा : अमोल कोल्हे

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसची सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. या यात्रेनिमित्त कारंजा येथे बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘माता भगिनींनो तुम्हाला जास्त महत्व आहे. तुमच्या आशा – आकांक्षाना सुरुंग लावणाऱ्या सरकारला खाली खेचण्याचे काम करायचं आहे’ असं आवाहन राज्यातील महिलांना केले.

तसेच पुढे बोलताना कोल्हे यांनी ‘शेतकऱ्यांचा कैवार कोण घेतंय हे लक्षात घ्या. आज रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे का करत आहेत लक्षात घ्या. रोजगार गेला, पीक विमाच्या परतावा मिळाला नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत तरी आपण थंड आहोत म्हणूनचं आपल्या डोक्यावर मिरच्या वाटल्या जात आहेत असेही अमोल कोल्हे म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ‘थंड आहोत… शांत आहोत… कारण आपल्या हातात स्मार्टफोन आहे त्यात मेसेज येतो देशप्रेमाचा…डोक्यात वेगवेगळे विषय… आंगठा चालतो कर फॉरवर्ड… भविष्याचा विचार करून चला… सातबारा कोरा होत नाही, कर्जमाफी होत नाही, रोजगार देणार याचं काही येत नाही याचा विचार करा असे आवाहनही अमोल कोल्हे यांनी केले.

दरम्यान, याचं सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी ‘राजकीय भ्रष्टाचार करणारी भाजपसारखी दुसरी पार्टी नाही अशी जोरदार टीका भाजपवर केली आहे. तसेच वृक्ष लागवडीवरुनही मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.