fbpx

शासकीय रुग्णालयातील नेत्र चिकित्सकाला लाच घेताना अटक

सातारा : येथील लाचलुचपतच्या अधिका-यांनी व कर्मचा-यांनी काल लावलेल्या सापळ्यात जिल्हा रूग्णालयातील नेत्र चिकित्सा अधिका-याला 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने साळसुदपणाचा आव आणणा-या कारभा-यांचा बुरखा तर फाटलाच आहे. पण जिल्हा रूग्णालयाच्या डोळ्यात लाचलुचपतचे अंजन गेल्याची चर्चा साता-यात आहे.

जिल्हा रूग्णालय म्हणजे कायम चर्चेत राहणारे कार्यालय अर्थात चांगल्या कामासाठी कमी आणि भानगडीसाठी जास्त. जिल्हा रुग्णालयात असलेली सुविधांची वाणवा आणि भरमसाठ दलाल यामुळे क्रांतिसिहांच्या नावाने सुरू असलेले जिल्हा रुग्णालय भुई-सपाट होण्याची वेळ आली आहे.जिल्हा रूग्णालयात नेत्र चिकित्सा अधिकारी म्हणुन नोकरी करणारा विजय निकम जरी 20 हजाराची लाच घेताना सापडला असला तरी ती एक फांदी आहे.

खोड तर तसचं शाबुत राहिलयं आणि वरून मजा पण घेताना दिसतयं. मुळात विजय निकम याने नेत्र अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून घेतलेली लाच आणि अपंगप्रमाणपत्र देण्याचे त्याचे अधिकार यांचा विचार केला, तर विजय निकम नेमका कुणासाठी काम करीत होता हे लक्षात यायला फारसा वेळ लागणार नाही. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाच्या कारभा-यांना झालेला खाबुगिरीचा फ्लू बरा करणे गरजेचे आहे.सातारा जिल्हा रूग्णालयात केसपेपर काढण्यापासुन ते मयताला सोडणा-या रूग्णवाहिकेपर्यंत प्रत्येक गोष्टीत मलिदा लाटला जातोयं.या सारख्या अनेक भानगडी सूरू आहेत त्याचा समाचार योग्य वेळी नक्कीच घेतला जाईल.

प्रमाणपत्रावर सहीचा अधिकार कुणाला ? जिल्हा रूग्णालयात सापडलेला विजय निकम हा फक्त मोहरा आहे. पण या अपंग प्रमाणपत्रावर सही करण्याचे अधिकार नेमके कुणाला आहेत याचा तपशील पाहिला तर जिल्हा रुग्णालय भुई-सपाट का होत आहे? याचे उत्तर मिळेल.तेवढे सुरेख सावकारीचे पण बघा जिल्हा रूग्णालयात सुरु असलेली ती सुरेख सावकारी तर अनेकांची डोकेदुखी ठरली आहे. मात्र त्या सावकारीला संघटनेचे कवर असल्याने सहसा कुणी वाट्याला जात नाही.

पण या सावकारीमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे लाचलुचपतच्या कारवाईने त्या सुरेख सावकारीचे पण तेवढे बघा असा सुर उमटत आहे.ती दिशा रुग्णांना दाखवते तरी कोण? जिल्हा रुग्णालयात येणा-या गरिबांना आजारपणात अनेक तपासण्या करणे गरजेचे असते. अशावेळी रूग्णालयातील अधिकारी रूग्णांना सातारा शहरातील एका खाजगी लॅबची दिशा दाखवत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे रुग्णालयात सुरू असलेली बजबजपुरी आता तरी थांबेल अशी आशा करायला हरकत नसावी.