16 लाख टन डाळ खरेदी करुन सरकारने इतिहास रचला; पंतप्रधान नरेंद्र मोदी

शेतकऱ्यांना ‘बीज से बाजार’ तक सुविधा देणार

वेबटीम : माझ्या शेतकऱ्यांमध्ये मातीतून सोनं पिकवण्याची धमक आहे, आमच्या सरकारने शेतीसाठी 99 योजना आणल्या असून त्यापैकी 21 योजना सुरु झाल्या आहेत. तर 50 योजना लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना ‘बीज से बाजार’ तक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात शेतीवर बोलताना सांगितल आहे.

देशाच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर पंतप्रधान मोदीं यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यंदा शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्याने डाळीचं विक्रमी उत्पन्न झालं आहे. तर सरकारने 16 लाख टन डाळ खरेदी करुन इतिहास रचला असल्याच हि भाष्य मोदी यांनी केले आहे.