‘आरक्षण देणं आमच्या हातात नाही’ ; सरकारने मराठा आरक्षणाबाबत हात झटकले

टीम महाराष्ट्र देशा : “आरक्षण देणं आमच्या हातात नाही. फी देणं किंवा योजना करणं ते आम्ही केलं आहे. मात्र आरक्षणाबाबत मागास आयोगाच्या अहवालावर सगळं अवलंबून आहे” असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगत मराठा आरक्षणाबाबत हात झटकले आहेत. राज्य सरकारने चेंडू पुन्हा एकदा मागास आयोगाच्या कोर्टात ढकलल्याचं चित्र आता समोर येत आहे.

“आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात नाही. मागास आयोगाने त्यांच्या पाहणीतून निष्कर्ष काढले आहेत. मराठा समाज मागास असेल तर त्यांना आरक्षण द्या. तो अहवाल स्वीकारणं हे सरकारचं काम आहे. शिवाय मागास आयोगाचा अहवाल लवकर येणं हे पण आमच्या हातात नाही, कारण ते स्वायत्त आहे. आयोगाला आवश्यक ” अस चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केल आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टाने नाकारलं. त्यामुळे मागास आयोगाने बनवलेला अहवालच कोर्टात सादर केला जाईल, अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.