fbpx

दुष्काळ निवारणासाठी सरकारकडे पैसे नाहीत : पृथ्वीराज चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. पण सरकारकडे दुष्काळाचा सामना करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ‘हिंदूस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज्यातील शेतीचे प्रश्न, दुष्काळ, बेरोजगारी यावरून त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर राज्यातील सध्याच्या सिंचनाच्या प्रकल्पांची माहिती देणारी श्वेतपत्रिकाच प्रसिद्ध करायला हवी, अशीही मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सिंचनाच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली नाही. जर सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे सरकार करीत असेल, तर त्यांनी त्याची सद्यस्थिती आमच्यासमोर मांडली पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.