fbpx

शेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश – धनंजय मुंडे

dhanjay mundhe

टीम महारष्ट्र देशा : साता-यातील खंडाळा गावातून अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना रविवारी मुंबईत अडवण्यात आले आहे. पोलिसांनी मोर्चेकऱ्या़ंना मानखुर्द येथे अडवून धरले. भूसंपादनासह विविध मागण्यांसाठी १२ जानेवारीपासून हे आंदोलक मुंबईच्या दिशेने पायी चालत येत होते. शेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे, असे म्हणतानाच महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अशी अवस्था कधीच नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान,हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही. शिवाय ज्या बागायती जमिनी अधिग्रहित केल्या आहेत त्याच्या मोबदल्यात उत्तम जमीन देणार येईल,अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. साताऱ्याच्या खंडाळ्याहून आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात सुभाष देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी ही माहिती दिली.

2 Comments

Click here to post a comment