पावसाच्या साध्या झुळकीने अधिवेशन स्थगित करावं लागणं हे सरकारचं अपयश – जयंत पाटील

नागपूर : पावसाच्या एका साध्या झुळकीने अधिवेशन स्थगित करावं लागणं याचा अर्थ राज्यसरकार किती निर्ढावलेले आहे…किती बेपर्वाई केलेली आहे. नागपूर येथे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलेला असताना याठिकाणी साध्या व्यवस्थाही सरकारला करता आलेल्या नाहीत हे सरकारचे अपयश आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी वीजपुरवठा बंद पडल्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी बंद ठेवावे लागले.विधीमंडळाच्या इतिहासामध्ये अशी घटना घडली असून त्यावर जयंत पाटील यांनी सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.

विधानसभेचे कामकाज बंद पडलं याचं मोठं कारण हे आहे की, सरकारने जो दुरदर्शीपणा दाखवायला हवा होता तो दाखवला नाही. पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली नाही. आमदार निवासही पाण्याने वेढलेलं होते. विधानसभेच्या सर्व इमारतीच्या आसपास पाण्याने वेढा दिला होता. पाणी इतकं वाढलं की वीजेचा पुरवठा करणाऱ्या सबस्टेशनजवळ पाणी साचलं आणि त्यामुळे वीजपुरवठा बंद झाला. पहिल्यांदा २५-३० वर्षात मी बघतोय असं घडतंय की साध्या पावसाच्या पाण्यामुळे राज्याच्या विधीमंडळाचं दोन्ही सभागृह स्थगित करावी लागली.

राज्यसरकारने पूर्ण जबाबदारीने नागपूरचे अधिवेशन पावसाळ्यात घ्यायचा निर्णय घेतला. आम्ही त्याला साथ दिली. गेले तीन दिवस आम्ही इथे आलो आहोत. पावसाळी जी खबरदारी घेवून आवश्यक त्या सुविधा ठेवणं आवश्यक होतं. मात्र यामध्ये राज्यसरकार फेल झालं आहे. विधीमंडळाची व्यवस्था करणारी जी लोकं आहेत त्यांनाही पूर्णपणे अपयश आलेले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आम्हाला सभागृहात मांडायचे होते. परंतु ते मांडता आलेले नाहीत. राज्यसरकारने आणि विधीमंडळाच्या व्यवस्थापन करणाऱ्या समितीने अत्यंत चुकीच्या पध्दतीने दुर्लक्षित करुन अधिवेशन भरवत असताना अनेक चुका केल्या आहेत त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी निषेध केला.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

सिडको भूखंड व्यवहाराला मुख्यमंत्र्यांची स्थगिती?

करमाळ्यावर शरद पवारांचे थेट लक्ष, रश्मी बागल यांना दिला भरघोस निधी

Shivjal