सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन; सातवा वेतन आयोग लागू

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे येत्या १ जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार असून १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पगारात वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगाचा १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात के.पी.बक्षी समितीच्या अहवालावरून मंत्रिमंडळाने आज त्यावर शिक्कामोर्तब केलं. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर २१ हजार कोटींचा बोजा पडणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात महिना ५ हजारापासून १४ हजारापर्यंत वाढ होणार आहे. तसेच १ जानेवारी २०१६ पासूनची तीन वर्षांची थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत (पीएफ) जमा केली जाणार आहे.

You might also like
Comments
Loading...