आरएसएसच्या शाखेत जाऊ शकतात सरकारी कर्मचारी; काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : हरियाणा सरकारने सन १९६७ आणि १९८० मधील दोन आदेश रद्द केले आहेत. यामुळे आता हरियाणा सरकारमधील कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात तसेच शाखेतही जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. आता मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या एका विधानावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जारी केलेल्या एका आदेशात म्हटले आहे की, नवीन हरियाणा सिव्हिल सर्व्हिसेस नियम तत्काळ प्रभावापासून लागू होत असून, यामुळे १९६७ आणि १९८० मधील आदेश रद्द होतील. नवीन नियमांमुळे आता हरियाणातील सरकारी कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. मात्र, सरकारच्या या आदेशाला काँग्रेसने विरोध दर्शवला असून, टीका केली आहे.

आता हरियाणाचे सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या शाखेत जाण्याची मुभा, सरकार चालवतायत की भाजप-संघाची पाठशाला, अशी खोचक विचारणा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. यामध्ये सुरजेवाला यांनी सरकारी आदेशाची एक प्रत शेअर केली आहे. रणदीप सुजेवाला यांनी ट्वीट करत खट्टर सरकारच्या नव्या नियमांना आक्षेप नोंदवत विरोध केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या