सरकारने आचरेकरांना सरकारी इतमामात निरोप देण्याचे कर्तव्य पार पाडले नाहीत-शिवसेना

मुंबई : सचिन तेंडुलकर यांचे गुरू आणि विख्यात क्रीडा प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनानंतर सगळीकडे शोककळा पसरली.त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का केले नाही मनून अनेकांनी सरकारवर टीका केली. आज सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनीही सरकारचे कान टोचले आहेत.

क्रिकेटचे भीष्माचार्य आणि क्रिकेटपटूंचे द्रोणाचार्य असणाऱ्या या महान आचार्याला शासकीय इतमामात अखेरचा निरोप द्यायला राज्य सरकार ‘विसरले’. मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली, पण त्यांच्या सरकारने ‘पद्मश्री’ आचरेकरांवर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य पार पाडले नाही.त्यामुळे सरकारचे कोतेपण उघडे पडले, असे म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्र्यावरच निशाणा साधला आहे.

राज्याचे ग्रहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांनी सरकारी यंत्रणांमध्ये विसंवाद झाल्याचं मान्य केलं आणि दिलगिरी व्यक्त केली होती.त्यावरून बोलताना म्हणाले,‘प्रोटोकॉल’ पाळण्यासंदर्भात ‘कम्युनिकेशन गॅप’ राहिला असावा अशी मखलाशी राज्य सरकारच्याच एका मंत्र्याने केली. हा सर्वच प्रकार जेवढा संतापजनक तेवढाच वेदनादायी आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत म्हणून आचरेकर सरांचे योगदान, महान कार्य कमी झाले नाही, पण सरकारचे कोतेपण मात्र उघडे पडले. क्रिकेट हा ज्यांचा श्वास होता आणि उत्तमोत्तम क्रिकेटपटू घडविणे हा ज्यांचा ध्यास होता ते रमाकांत आचरेकर आपल्यातून गेले. हिंदुस्थानी क्रिकेटचे एक ‘ध्यास’पर्व संपले!

You might also like
Comments
Loading...