मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा आज (28 जून, मंगळवार) आठवा दिवस आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गेल्या सात दिवसांपासून अडचणीत सापडले आहे. अशा स्थितीत 22 जून ते 24 जून दरम्यान ठाकरे सरकारने कोट्यवधी रुपयांचे अध्यादेश आणि प्रस्ताव ( Government Resolution-GR ) काढले. आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सरकारच्या या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तीन दिवसांत कोट्यवधी रुपयांचे किती जीआर मंजूर झाले? असा सवाल करत राज्यपालांनी ठाकरे सरकारला सविस्तर अहवाल देण्यास सांगितले आहे. सरकार अडचणीत येण्याची शक्यता पाहून घाईगडबडीत मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या या जीआरबाबत राज्याचे मुख्य सचिव काय देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, आज दुपारी अडीच वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटातील बंडखोरीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राज्यपालांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्राबाबतही या बैठकीत चर्चा होऊ शकते.
माविआ सरकारने तीन दिवसांत 280 जीआर काढले आहेत. 20 जून रोजी 30 जीआर काढण्यात आला, 21 जून रोजी 81 जीआर काढण्यात आला. 22 जून रोजी 54 जीआर काढल्याची माहिती समोर आली असून 23 जून रोजी जीआरची संख्या 57 वर पोहोचली आहे. 24 जून रोजीही 58 जीआर काढण्यात आले. एवढ्या घाईत त्यांना दिलेल्या मंजुरीवर राज्यपालांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दरेकर यांनी चौकशीची मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<