‘काश्मीरबाबत सरकारने घेतलेला निर्णय घटनेचे उल्लंघन करणारा’

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू काश्मिरला दिलेले कलम 370 हटवले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील मोदी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. तर याआधी माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील विरोधात प्रतिक्रिया दिली होती.

काश्मीरबाबत सरकारने घेतलेला निर्णय घटनेचे उल्लंघन करणारा आहे, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी दिली. अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी दिली आहे. खासकरून गुलाम नबी आझाद कॉंग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने देखील कलम 370 हटवताना घटनेला ग्राह्य धरले असल्याचं म्हंटल आहे.

दरम्यान मोदी सरकारने मोठा निर्णय घेत कलम ३७० काढून टाकले असून काश्मीर राज्याचे विभाजनही करण्यात आले आहे. यानुसार आता राज्याबाहेरील जनतेला काश्मीरमध्ये वास्तव्य करता येणार आहे. तसेच काश्मीर आणि लडाख यांना केंद्र्शाशित प्रदेशाचा दर्जाही देण्यात आला आहे.