सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम आणि लिंगायत समाजाला फसवले- धनंजय मुंडे

जयसिंगपूर: हल्लाबोल यात्रचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते भाजप सरकारवर प्रहार करत आहेत. सरकारने धनगर समाजाला फसवले, मराठा, मुस्लिम समाजाला फसवले, लिंगायत समाजाला फसवले. या फसवणुकीच्या विरोधात आपल्याला आवाज उठवायलाच हवा, असे आव्हान धनंजय मुंडे यांनी जनतेला केले.

धनंजय मुंडे म्हणाले, सरकार कधी ट्रिपल तलाकचा मुद्दा काढतं, कधी हज सबसिडीचा. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे राजकारण सुरू केले आहे. काय सुरू आहे या देशात? असा प्रश्न उपस्थित केला. महागाई थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिला, तो त्यांनी पाळला नाही. तरुणांना रोजगार देण्याचा शब्द दिला, आजही तरुण रोजगाराच्या शोधात आहे. पंतप्रधानांनी सांगितल्याने लोकांनी जनधन खाते उघडले त्यात १५ पैसे देखील जमा झालेले नाही. असे धनंजय मुंडे यांनी स्पष केले.

You might also like
Comments
Loading...