सरकारच्या गप्पांचा स्पीड ‘5G’, कामकाजाचा सर्व्हर मात्र डाऊन : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा- डिजिटल इंडियाच्या गप्पा करण्यात भाजपा सरकारचा स्पीड ‘5G’ च्याही पुढे आहे. पण प्रत्यक्ष कामकाज मात्र डाऊन आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी एका ट्विटद्वारे सरकारच्या कारभारावर निशाणा साधलाय.

बुधवारी सकाळपासूनच राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे राज्यभरातले व्यवहार ठप्प झाले. नोंदणीसाठी आलेल्यांची मोठीच गैरसोय झाली. त्याबाबत अजित पवार यांची ही प्रतिक्रिया होती.