मूळ आरक्षण असलेल्या जाती-जमातींचेच आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा डाव – जितेंद्र आव्हाड

Jitendra-Awhad

सरकार जर भासवत असेल की, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत, धनगर समाजाला आरक्षण देणार आहोत ते निखालस खोटं बोलत आहेत. मूळ आरक्षण असलेल्या जाती-जमातींचेच आरक्षण रद्द करण्याच्या मागे सरकार लागलेले आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

शासन कुणालाच आरक्षण देवू इच्छित नाही किंबहूना ज्या आरक्षित जाती आहेत. संविधानाने आरक्षित केलेल्या जाती आहेत. ओबीसी, एससी, एसटी यांचंही आरक्षण रद्द करण्याच्यामागे सरकार लागले आहे असा आरोपही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.

एमपीएससीद्वारे दिलेल्या जाहिरातीमध्ये हजारो पदांच्या जाहिराती येत आहेत. त्यामध्ये एकही आरक्षित जागा येत नाही. पण त्याचबरोबर ओपनमधून आरक्षित समाजाने जायचंच नाही असा अलिखित नियम या मनुवादी सरकारने केला आहे असाही आरोप आव्हाड यांनी केला.