पुढील २५ वर्षे एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊ शकत नाही – दिवाकर रावते

Diwakar-Raote

परिवहन महामंडळाच्या तिजोरीत पैसाच नसल्याने पुढील किमान २५ वर्षे महामंडळ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊच शकत नसल्याच विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल आहे. अस असल तरीही सरकारने सातवा वेतन आयोग द्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती केली . मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग देवू शकणार नसल्याच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल असल्याचही रावते यांनी सांगितल आहे.

राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा तसेच पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी आणि इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर संप पुकारण्यात आल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. मात्र सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याच दिवाकर रावते यांच्या विधानावरून दिसत आहे. तर कर्मचाऱ्यांच्या संपा माघे कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप रावते यांनी केला आहे.

सरकारकडूनच खासगी गाड्याद्वारे प्रवाशांची वाहतूक
एका बाजूला आपल्या मागण्यावर ठाम असणारे एस टी कर्मचारी तर दुसरीकडे आडमुठे सरकार यांच्यामुळे प्रवाशी बेहाल झाले आहेत. तर आता सरकारकडून थेट बस स्थानकामधून खासगी बसद्वारे प्रवाशांची वाहतूक केलीं जात आहे. त्यामुळे हे सर्व चित्र पाहून कर्मचारीही आक्रमक झाले असून खासगी बसद्वारे प्रवाशी वाहतुकीला त्यांच्याकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे एकंदरीतच या संपावर लवकरात लकवर तोडगा निघाला नाही तर वातावरण आणखीन चिघळू शकते.