शहरी भागातील भारनियमन मागे, तर ग्रामीण भागातील कायम

मुंबई : शहरी भागात कालपासून लागू करण्यात आलेले भारनियमन आज तातडीने मागे घेण्यात आले . यात मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे या भागांचा समावेश आहे. मात्र, ग्रामीण भागातील भारनियमन कायम राहणार आहे.

bagdure

2100 मेगावॅट विजेचा चा तुटवडा कायम असल्याने ग्रामीण भागातील भारनियमन कायम ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोळसा उपलब्ध नसल्याने आणि विजेचा वापर वाढल्यामुळे दीड ते दोन हजार मेगावॅटची तुटवडा निर्माण झाला आहे.

या कारणास्तव राज्यात कालपासून तातडीचे भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

You might also like
Comments
Loading...